Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Saral Education maharashtra gov (मुख्याध्यापकांसाठी )

नवोदय प्रवेश परीक्षा सराव SOFTWARE साठी येथे क्लिक करा.

सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .

या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.

१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in हा वेब अड्रेस टाका  व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.


३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.

४. Student Tab वर क्लिक केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha box मध्ये वरील दिसणारे अंक टाका आणि login वर क्लिक करा. 

५. login झाल्यावर नवीन पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर sms  द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school details वर क्लिक करून शाळेची माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर भरा. 
८. आता Master Tab वर  तुमच्या माउस चा pointer न्या लगेच खाली Division व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा .आपणास खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते १० पर्यंत गरज नाही. Division मध्ये तुकडी टाकायची आहे जर शाळेत एकच तुकडी असेल तर १ असा अंक वापरा. . medium मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add या बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेची तुकडी समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.


वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव , शालार्थ id असेल तर , Designation मध्ये जर तो वर्ग शिक्षक असेल तर class teacher व नसेल तर assistant teacher असे टाकावे. शिक्षकाचा मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register या बटनावर क्लिक करा. सर्व शिक्षकांची माहिती भरून झाल्यावर master या बटनावर माउस नेऊन Assign Class Teacher या बटनावर क्लिक करा.
१०. Assign Class Teacher या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल कि ज्यामध्ये आपण तुकड्यांसाठी वर्ग शिक्षक देऊ शकतो असे केले नाही तर शिक्षकांनी login केल्यावर ते माहिती भरू शकत नाही.
यामध्ये वर्ग व तुकडी निवडून शिक्षक निवडा व assign बटनावर क्लिक करा.
काही अडचण असल्यास खाली comment post करा येथे क्लिक करा.
शिक्षक माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा.


Thank you!!!!

Post a Comment

0 Comments