Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

Our Planet (आपली पृथ्वी )


पृथ्वी म्हणजे आपले घर, पृथ्वी हा  सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वी हा एकमेव सजीव सृष्टी असलेला ग्रह आहे कि जिच्यावर ऑक्सिजन , पाणी मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह हा पृथ्वी आहे.

पृथ्वी हा सूर्यमालेतील पाचवा मोठा ग्रह आहे. पृथ्वीचा व्यास १३,००० किमी आहे . जिचा ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन हा प्रमुख वायू सजीवांसाठी आवस्यक आहे. पृथ्वीला 'निळा' ग्रह असेही म्हणतात. (blue planet)


  • पृथ्वी ही सूर्यापासून सरासरी १४,९५,९८,२६२ किमी लांब आहे.  (सर्वात कमी अंतर १४७०९८२९१ किमी) (सर्वात जास्त अंतर १५२०९८२३३ किमी )
  • शास्रज्ञांच्या मते पृथ्वीची निर्मिती ४.६ कोटी वर्षांपूर्वी झाली.
  • लीप वर्ष :- पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५दिवस आणि ६ तास लागतात. सर्वसाधारणपणे एका वर्षात ३६५ दिवस मोजले जातात पण राहिलेल्या ६ तासांसाठी दर चार वर्षांनी एक दिवस समाविष्ट केला जातो . त्या वर्षी ३६६ दिवस येतात त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. .(२०००,२००४,२००८,२०१२,२०१६)
  • पृथ्वीला Ocean planet असेही म्हणतात. (समुद्र)


पृथ्वीवर सजीव सृष्टी का आहे?

  • वातावरण:- पृथ्वीच्या वातावरणात २१ टक्के ऑक्सिजन आहे तो इतर ठिकाणी आढळत नाही. पृथ्वीवरील ऑक्सिजन वृक्ष आणि झाडे नियंत्रित करतात. 
  • हवामान :- पृथ्वीचे हवामान सजीवांसाठी पोषक आहे . तापमान सुद्धा  पोषक आहे इतर ग्रहांवर तापमान खूप जास्त किंवा खूप कमी आहे अशा तापमानात सजीव वाढू शकत नाहीत. पृथ्वीवरील ७१ टक्के पाणी तापमान नियंत्रित करते .
  • पाणी :- सजीवांच्या जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. पाणी हे पृथ्वीवर मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. इतर ग्रहांवर ते आढळत नाही.
  • प्रकाश आणि सूर्य :- पृथ्वी आणि सूर्य यातील अंतर सुयोग्य आहे , सूर्या पासून मिळणारा प्रकाश व उष्णता योग्य प्रमाणात मिळते. वनस्पतींच्या वाढीसाठी सूर्य प्रकाश आवश्यक असतो.

Post a Comment

5 Comments