Rayat Result 5th Scholarship Navodaya Entrance 6th Science My Vocabulary 7th Science 10th Geography

हे आपणास माहीत आहे का?


पेशी :-
           आपल्या शरीराची रचना हि पेशींपासून झालेली आहे. आपल्या शरीरात १० trillion (म्हणजे १० वर १२ शून्य ) पेशी आहेत . शरीरातील पेशींची विभागणी २०० प्रकारात  झालेली आहे. आपल्या शरीरातील सर्व अवयव हे पेशींपासून बनलेले आहेत.

हृद्य :-
          आपल्या शरीरातील रक्ताभिसरण संस्थेतील प्रमुख अवयव म्हणजे हृद्य होय . प्रत्येक दिवसाला आपले हृद्य जवळ जवळ १,००,००० वेळा धडकते आणि २००० gallon (1 gallon म्हणजे ४.५ लिटर ) रक्त पुरवठा करते. आपले हृद्य ६०,००० मैल्स ( १ मैल = १.६ किमी ) लांब रक्त वाहिन्यातून प्रत्येक पेशी व ऊती ला रक्त पुरवठा करते .


यकृत :-
        आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे यकृत होय . यकृताचे वजन १.४ किग्र असते . आपले यकृत ५०० वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करते. यकृताला इंधन टाकी असेही म्हणतात. कारण यकृतामध्ये ग्लुकोज हे ग्लायकोजन च्या स्वरुपात साठवले जाते ज्यावेळी शरीराला उर्जेची गरज भासते त्यावेळी त्याचा उपयोग केला जातो. यकृत कार्बोहाड्रेड चे ग्लुकोज मध्ये रुपांतर करते.

जठर :-
       आपल्या शरीरात  जठर हे पोटाच्या वरील व डाव्या बाजूस असते. जठरामध्ये असलेले HCL आम्ल अन्नातील जंतू व विषाणू मारण्याचे काम करते. थोडक्यात रोगांपासून बचाव करते. सामान्य मानवाचे जठर हे १.५ ली ते ४.५ ली अन्न साठवू शकते. जठराचा सामू (PH) हा २ असतो म्हणजे strongly acidic. आपले जठर हे स्वतः ला देखील पचवू शकते तसे होऊ नये म्हणून दर दोन आठवड्याला Mucus (श्लेमा सारखा चिकट पदार्थ तयार करतो) ची नवीन layer  तयार करते.


Post a Comment

2 Comments